मूग ऑम्लेट
साहित्य :
- मूग डाळ - १ वाटी
- हळद - १/४ चमचा
- तांदळाचे पीठ - २ चमचे
- मीठ - चवीनुसार
- जिरे - १/२ चमचा
- हिरवी मिरची - १ ते २
- आलं पेस्ट - १ चमचा
- खाण्याचा सोडा - १/२ चमचा
- कांदा - १
- टॉमॅटो - १
- शिमला मिरची - १
- तेल
- चिस
- टॉमॅटो सॉस
कृती :
१) एक वाटी मूगाची डाळ ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
२) भिजलेली मूगडाळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
३) वाटलेल्या डाळीमध्ये तांदळाचे पीठ, हळद आणि चवीनुसार मीठ घालून ते एकजीव करून घ्या. ( हे मिश्रण खूप जास्त पातळ करू नये.)
४) एकजीव केलेल्या मिश्रणात एक चमचा हिरवी मिरची, आलं पेस्ट, २ चमचे बारीक कापलेला कांदा, २ चमचे बारीक कापलेले टमाटर, थोडी शिमला मिरची आणि थोडा खायचा सोडा टाकून मिश्रण ढवळून घ्या.
५) एका पॅन मध्ये १ चमचा तेल घालून वरील मिश्रण ऑमलेट प्रमाणे गोलाकार टाकून दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्या.
६) तयार ऑम्लेटवर टोमॅटो सॉस आणि चिस टाकून सर्व्ह करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.