बनाना बन्स (Banana buns)
साहित्य :
- केळी - २ (पूर्ण पिकलेली )
- साखर - २ ते ३ चमचे
- दही - १/४ वाटी
- जिरं - १ चमचा
- बेकिंग सोडा - चिमूटभर
- मीठ - चवीनुसार
- मैदा - २ वाटी
- तेल
कृती :
१) एका भांड्यात २ केली कुस्करून त्यात साखर, दही, जिरं आणि बेकिंग सोडा टाकून मिक्स करा.
२) वरील मिश्रणात चवीनुसार मीठ आणि मैदा घालून मळून घ्या.
३) मळलेल्या पिठाला तेल लावून तो गोळा ८ तास आंबवत ठेवा .
४) आता तयार पिठाचे गोळे करून मैद्याचे पीठ लावून पुऱ्या बनवून घ्या.
५) कढईत तेल गरम करून त्यात बनवलेल्या पुऱ्या सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.
अशा प्रकारे आपले बनाना बन्स तयार होतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.