घेवड़ा फ़्राय
साहित्य :
- घेवड़ा भाजी - २५ ग्राम
- भिजवलेली चणाडाळ - १ वाटी
- आलं
- कोथिंबीर
- कढीपत्ता
- हिरव्या मिरच्या -४
- लाल तिखट - २ चमचे
- हळद - १/२ चमचा
- साखर - १/२ चमचा
- लिंबू - १
- तांदळाचे पीठ - २ चमचा
- ओल खबर - १/२ वाटी
- जिरं - १/२ चमचा
- तेल
- मीठ
कृती :
१) घेवडा स्वच्छ धुऊन त्याचे २ भाग करावे. (दोन वेगवेगळे भाग करू नये.)
२) घेवड्याची एक बाजू उघडून ठेवावी. सारण भरण्यासाठी.
३) भिजवलेली चणाडाळ घेऊन त्यात मिरची कोथिंबीर कढीपत्ता, जिरं, ओला खोबर घालून हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावं.
४) वाटलेल्या मिश्रणात हळद, लाल तिखट, तांदळाचे पीठ, मीठ रस घालून सर्व मिश्रण एकजीव करावे.
५) हे सारण घेवड्या मध्ये भारून घेवडा उकडून घ्यावा.
६) उकडलेला घेवडा तेलात फ्राय करावा. किव्हा थोड्या तेलात शॅलो फ्राय करून घ्यावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.