कच्च्या केळीचे समोसे
साहित्य :
कृती :
साहित्य :
- मैदा - १ वाटी
- कच्ची केळी - २ ते ३ ( उकडून मॅश केलेली)
- ओवा - १ चमचा
- जिरं पूड - १ चमचा
- आमसूल पूड - १ चमचा
- धणेपूड - १ चमचा
- हळद - १/२ चमचा
- तिखट - १ चमचा
- मीठ - चवीनुसार
- आलं -लसूण पेस्ट - १ चमचा
- कोथिंबीर
- तेल.
कृती :
१) सर्वप्रथम मैद्यामध्ये गोड तेलाचे मोयन, ओवा, मीठ, घालून लागतं तेवढं
पाणी घालून घट्ट मळून घ्यायचे. (ह्या गोळ्याला 15 ते 20 मिनिटे झाकून
ठेवावे.)
२) एका कढईत तेल घालून या मध्ये जीरपूड, आलं लसूण पेस्ट,
आमसूल पूड, मॅश केलेले केळी, हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यायचे.
३) ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
४) आता मैद्याच्या तयार पीठाचे बारीक गोळे करून मैद्याची पोळी लाटून घ्या .
(पारी जास्त जाड किंवा बारीक नसावी.)
५) आता त्या पोळीचे मधून काप करावे. त्या कापाच्या वरील
टोकाला पाणी लावून त्याला खालचे टोक जोडून त्याला त्रिकोणाकार आकार
द्यावा.
६) त्यामध्ये सारण भरावे आणि पुन्हा सर्व बाजूच्या कड्यांना पाणी लावून
चिकटवून घ्यावे.
७) आता समोसे कढईत तेल गरम करून मध्य आचेवर तांबूस रंग
येईपर्यंत तळावे.
चिंचेच्या चटणी किंवा हिरव्या चटणी सोबत गरमागरम खुसखुशीत समोसे सर्व्ह करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.