चिकन सॅन्डविच
साहित्य :
- बोनलेस चिकन -१५० ग्राम
- शिमला मिर्ची - १
- कांदा - १
- मेयोनीस - १/२ वाटी
- काळी मिरी पूड - १/२ चमचा
- चीज
- टॉमॅटो केचप - १/२ वाटी
- अमूल बटर
- ब्रेड
कृती :
१) चिकन थोडं मीठ टाकून उकडून घ्या.
२)एका भांड्यात उकडलेले चिकन बारीक कापलेली शिमला मिरची आणि कांदा टाकून मिक्स करा.
३)आता त्या मध्ये मेयोनीस, टॉमॅटो केचप, मिरी पूड, चीज घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्या.
४) ब्रेड ला अमूल बटर लावून त्यावर तयार मिश्रण लावून त्यावर दुसरा ब्रेड ठेऊन त्याला सुद्धा अमूल बटर लावा.
५)पॅन मध्ये तयार सँडविच दोन्ही बाजूने कडक होई पर्यंत भाजून घ्या.
चिकन सँडविच चटणी किव्हा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.