पोह्यांचे कटलेट
साहित्य :
१. पोहे -१ काप
२.उकडलेले बटाटे -२
३. कांदा -१
४. वाटाणे (हिरवे ) - १/२ कप
५. गाजर (खिसलेले ) - १/२ कप
६. आलं पेस्ट -१ चमचा
७. हळद - १/२ चमचा
८. लाल तिखट - १ चमचा
९. गरम मसाला - १ चमचा
१०. चाट मसाला- १ चमचा
११. मीठ -चवीनुसार
१२. कोथिबीर - १ चमचा
१३. कॉनफ्लॉवर - ३ चमचे
१४. पाणी
१५. ब्रेड चा चुरा (breadcrumbs )
१६. तेल - तळण्यासाठी
कृती :
१) पोहे ३ मिनिटे पाण्यात भिजवून पाणी काढून थोडा वेळ झाकून ठेवावीत.
२) एका पातेल्यात उकडलेले बटाटे घेऊन ते व्यवस्तीत कुस्करून त्या मध्ये भिजवलेले पोहे, उकडलेले वाटाणे, खिसलेले गाजर, आलं पेस्ट , हळद, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ घालून ते सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे.
३) हाताला थोडे पाणी किव्हा तेल लावून या मिश्रणाचे कटलेट सारखे गोळे करून घ्यावेत.
४) आता एका वाटीत ३ चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात चिमटभर मीठ आणि थोडे पाणी टाकून नीट ढवळून घ्यावं. ( आपण भजीला जेवढं पीठ पात्तळ करतो तेवढं करावं.)
५) ५-६ ब्रेट घेऊन त्याच्या कडा कापून त्या मिक्सर मध्ये बारीक करून घ्याव्यात.
६) आता पोह्याचे कटलेट कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकून तो दोन्ही बाजून नीट लावावा.
७) कढईत तेल तापत ठेऊन ते कडकडीत तापल्यावर कटलेट अलगत त्या मध्ये सोडावे. खरपूस तळून घ्यावे.
तयार कटलेट टोमॅटो सॉस किव्हा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.