खमंग पनीर मसाला
साहित्य :
- पनीर - २०० ग्राम
- क्रीम - १ चमचा
- टोमाटो प्युरी - १ वाटी
- बारीक चिरलेला कांदा - १
- आले-लसूण पेस्ट - १/२ चमचा
- टोमाटो केचप - १ चमचा
- धने-जिरे पावडर - १/२ चमचा
- हळद - १/२ चमचा
- लाल तिखट - १ चमचा
- गरम मसाला - १/२ चमचा
- साखर - १/२ चमचा
- कसूरी मेथी - १/२ चमचा
- मीठ - चवीनुसार
- तूप
- तमालपत्र - १
- मोठी वेलची - १
- चक्रीफूल - १
- ऑरेंज कलर - २ ते ४ थेंब
कृती :
१) पनीर घट्ट असेल तर ते पाच ते दहा मिनिटे पाण्यात टाकून उकळून घ्यावे . (म्हणजे पनीर नरम होते)
२) तुपात वेलची , तमालपत्र व चक्रीफुल फोडणी करून कांदा साधारण ब्राऊन कलर येईपर्यंत परतावा .
३) नंतर आले-लसूण पेस्ट टाकून परतावे .

४) टोमाटो बारीक चिरून ते कांदयात टाकून परतावे . कांदा , टोमाटो एकजीव झाला पाहिजे .
५) पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट , पाव चमचा गरम मसाला , अर्धा चमचा धने-जिरे पावडर टाकून किंचित साखर व चवीला मीठ टाकावे . थोडे पाणी टाकून जाडसर रस्सा करावा .
५) पनीरचे तुकडे करून त्यांना दोन ते चार ऑरेंज कलर लावून ठेवावा . रस्सा चांगला उकळला की त्यात एक टेबल स्पून टोमाटो केचप टाकावा .
६) क्रीम घोटून टाकावे . अर्धा चमचा कसूरी मेथी पावडर करून टाकावी . पनीरचे तुकडे टाकून दोन ते चार मिनिटे शिजवावे . कोथिंबीर चिरून टाकावी .
७) गैसवर एक लहान कोळशाचा तुकडा चांगला लाल करावा . पनीरच्या भांडयात एक लहान वाटी ठेवावी .
८) चांगला लाल झालेला कोळसा त्या वाटीत ठेवून त्यावर एक-दोन चमचे तूप सोडावे . पनीरच्या भांडयावर लगेच झाकण ठेवावे .
९) तुपाचा धूर होईल आणि तो छान वास पनीरला लागेल . पाच मिनिटांनंतर झाकण काढून कोळशाची वाटी काढून घेऊन परत झाकण ठेवणे .

I made your food at home and it tasted very good.... you are very respectful.....
उत्तर द्याहटवा