खारं वांग

खारं वांग

bharli vangi | Recipes | Desi Cooking Recipes

साहित्य :

  • वांगी- ४ ते ५
  • सुख खोबरं - अर्धी वाटी
  • लसूण - ८ ते ९ पाकळ्या 
  • आलं
  • जिरं - १/२ चमचा
  • कढीपत्ता
  • लवंग - २
  • काली मिरी - ४
  • दालचीनी
  • शेंदण्याचे कूट - २ चमचे
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल

कृती :

१) मिक्सर मध्ये खोबरं, आलं-लसूण, लवंग, काली मिरी, अर्धा इंच दालचिनी, कढीपत्ता आणि थोड पाणी टाकून       वाटून घ्या.
२) वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्या मध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचे कूट टाका.
३) वांगी स्वच्छ धुऊन त्याचे ४ काप करून ते मिश्रण वांग्यांन मध्ये भरा.
४) कढईत तेल गरम करून जिरं आणि कढीपत्ता घालून वांगी त्या तेलात सोडा. (तेलाचे प्रमाण जरा जास्त ठेवावे.)     
५)मंद आचेवर झाकण देऊन वांगी शिजू द्यावी.
 


टिप्पण्या