झणझणीत अळूवडी

झणझणीत अळूवडी


Aalu Vadi | Dhanashrih's Cooking Blog

साहित्य :

१. अळूची पाने - ३ ते ४
२. बेसन - १ ते २ वाटी
३. हिरव्या मिरच्या - ५-६
४. आलं
५. लसूण - १५ पाकळ्या
६. सुख खोबरे - अर्धी वाटी
७. जिरं - १ चमचा
८. कोथिंबीर
९. हळद - १/२ चमचा
१०. मीठ -चवीनुसार
११. पाणी
१२. तेल 

कृती :

१) अळूची पाने पाण्याने स्वच्छ धुवून त्याची देठ व शिरा काढून टाका.
२) लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, कोथिंबीर, जिरं, मिरच्या थोडं पाणी टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३) एका भांड्यात बेसन घेऊन त्यात थोडं हळद, मीठ, वरील वाटलेलं मिश्रण आणि पाणी घालून एकजीव करून घ्या. (हे मिश्रण थोडं घट्ट ठेवावे.)
४) अळूची पाने उलट्या बाजूने पसरवून त्यावर बेसनाचे मिश्रण लावावे व त्यावर आणखीन एक पान ठेऊन त्याला देखील मिश्रण लावाले. आता हि पाने गोलाकार गुंडाळून एका ताटात ठेवावी.
५) एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं. त्यात एखादी जाड वस्तू किव्हा छोटा टोप उलटा ठेऊन ठेवायचं. (कारण आपल्याला अळूवडी उकडायची आहे.)
६) पाण्याला वाफ आली कि अळुवडीचं ताट त्यावर ठेवीन झाकण देऊन अळूवडी उकडून घ्यायची. (१०-१५मिनिट)
७) उकडलेली अळूवडी थंड झाल्यावर त्याच्या बारी वड्या पडायच्या.
८)एका कढईत तेल गरम करून अळूवडी खरपूस तळून घ्यायची.
अशा प्रकारे गरमागरम अळूवडी खायला तयार होईल.

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.