कुरकुरीत डाळीचे डोसे
साहित्य :
- तूरडाळ - १ वाटी
- चणा डाळ - १ वाटी
- उडीद डाळ १ वाटी
- मुगाची डाळ - १ वाटी
- तांदूळ - १ वाटी
- मीठ - चवीनुसार
- हिरव्या मिरच्या - ३ ते ४
- मेथीदाणे - १ चमचा
कृती :
१) तूर डाळ, चणा डाळ, तांदूळ, उडीद डाळ, मुगाची डाळ, हे सर्व साहित्य ६-७ तास वेगळे-वेगळे भिजवावे.२) नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
३) त्यातच मेथीदाणे, हिरव्या मिरच्या पण वाटून घ्यावे.
४) नंतर ह्या पीठाला ६-७ तास आंबवण्यासाठी ठेवावे.
५) नंतर डोसाच्या तव्यावर डोसे तयार करावे.
तयार डोसे ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
पौष्टीक नाश्ता, खोबराची चटणीची माहिती सांगा.
उत्तर द्याहटवा