मूग पायसम (मूगाची खीर)
साहित्य :
- मूग डाळ -५० ग्राम
- गुल- १ वाटी
- काजू, बदाम, मनुके, चारोळी
- साबुदाणे - २ चमचे
- चना डाळ - १ चमचा
- नारळाचे दूध - १ मोठी वाटी (२५० मिली )
- वेलची पूड
- मीठ
- तूप
कृती :
१) साबुदाणे आणि चण्याची डाळ २ ते ३ तास भिजत ठेवावी.
२) एका भांड्यात मूग डाळ स्वछ धुऊन शिजवावी.
३) शिजलेल्या मूगडाळीत भिजवलेले साबुदाणे आणि चना डाळ टाकून ती शिजवावी.
४) आता शिजलेल्या डाळींमध्ये खिसलेला गूळ आणि सुका मेवा घालून ढवळून घ्यावे.
५) नारळाचे दूध घालून ते मिश्रण सतत ढवळत राहावे.
६)तयार खिरीत वेलची पूड आणि थोडं मीठ घालून त्यावर साजूक तुपाची धार सोडावी.
अशा प्रकारे मुगाची खीर खाण्यासाठी तयार होईल.
टीप : १ खीर बनवताना ती सतत ढवळत राहावी नाही तर ती तळाला लागू शकते.
२ खिरीचा प्रमाण जर वाढवायचं असेल तर नारळाच्या दुधाचं प्रमाण वाढवावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.