थालीपीठ

थालीपीठ 
 








साहित्य :
  • ज्वारीचे पीठ -२ वटी 
  • बेसन - १/४ वाटी 
  • गव्हाचे पीठ - १/४ वाटी 
  • भिजवलेले पोहे - १/४ वाटी 
  • हळद - १ चमचे 
  • तीळ - २ चमचे
  • लसूण पाकळ्या - ५- ६
  • हिरवी मिरची - २
  • धने - १ चमचा 
  • जिरे - १ चमचा
  • ओवा - १/२ चमचा
  • मीठ 
  • कांदा - १ 
  • कोथिंबीर 
  • तेल 
कृती :
१)  एका भांड्यात ज्वारीचे पीठ, बेसन, गाव्हाचे पीठ, भिजलेले पोहे, हळद आणि तीळ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
२) लसूण, मिरची, धने, जिरे, ओवा, आणि मीठ मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
३) पिठाच्या मिश्रणात वाटलेले मिश्रण घालून त्यात कापलेला कांदा ताकून पीठ मळून घ्या.
४) ओला रुमाल पोलपाटावर पसरून त्यावर हाताने थालीपीठ थापून घ्यावे.
५) ताव गरम करून त्यात तेल टाकून थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे.
    तयार थालीपीठ खोबऱ्याच्या चटणी सोबत किव्हा मुगाची मिसळ बनवून सर्व्ह करावं.

टिप्पण्या