उपवासाची आंबोली
साहित्य :
कृती :
साहित्य :
- वरीचे तांदूळ / भगर - १ वाटी
- भिजवलेले साबुदाणे - ४ चमचे
- दही - १/२ वाटी
- मीठ
- ओल खोबर - १/४ वाटी
- खाण्याचा सोडा - चिमूटभर
- तेल
कृती :
१) वरीचे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवावा.
२) भिजवलेले शाबूदाणे, वरीचे तांदूळ ( पाणी काढून )आणि खोबरे मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३) एका भांड्यात शाबुदाण्याचे मिश्रण काढून त्यामध्ये दही, मीठ आणि सोडा टाकून एकजीव करून घ्या. (थोडं पाणी घालून पातळ करावे. )
४) पॅन किव्हा तवा गरम करून त्याला थोडं तेल लावून त्यावर वरील मिश्रणाच्या आंबोळ्या घालून झाकण देऊन २-३ मिनिट भाजून घ्याव्यात.
अशा प्रकारे तयार आंबोळ्या खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
चटणी :
ओला खोबर, २-३ हिरव्या मिरच्या आणि थोडं मीठ मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावं.
एकया भांड्यात थोडं तेल टाकून त्यात जिरं भाजून घ्यावं. भाजलेले जिरे खोबयाच्या वाटणात मिक्स करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.