मावा बर्फी
साहित्य :
- दूध - 2 लिटर
- साखर - ३ ते ४ चमचे
- तूप - २ ते ३ चमचे
- लिंबू - १/२ चमचा
- बदाम-पिस्ता
कृती :
१) एका भांड्यात २ लिटर दूध गरम करायला ठेवा. मंद आचेवर दूध १/४ लिटर होई पर्यंत तापवा.
२) दूध अर्ध झाल्यावर त्या मध्ये १ चमचा लिंबू रस मिसळून ते दूध फाटे पर्यंत शिजू द्या.
३) दूध जेव्हा दही सारखे घट्ट होईल तेव्हा त्या मध्ये साखर टाकून मिक्स करा.
४) जसे जसे दूध घट्ट होत जाईल तसे तसे त्या मध्ये एक एक चमचा तूप टाकून ते मिक्स करत राहा.
५) मिश्रण घट्ट झाले कि गॅस बंद करून ते मिश्रण एका भांड्यात काढून पसरून घ्या.
६) बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप टाकून झाकण देऊन २० मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा.
७))थंड झालेल्या मिश्रणाला बर्फीच्या आकाराचे काप द्या.
टीप :
- बर्फी करताना गॅस पूर्ण वेळ मंद आचेवर ठेवावा.
- आपल्या आवडी प्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करता येईल.
- दूध फाटल्या नंतर ते बर्फी होई पर्यंत सतत ढवळत राहणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.