झणझणीत मिसळ
साहित्य :
साहित्य :
- मटकी - 500 ग्रॅम (मोड आलेली)
- कांदे - २
- टोमॅटो - २
- लसूण पाकळ्या - १० ते १२
- हिरव्या मिरच्या - ४ ते ५
- आल्याचा तुकडा - १ इंच
- दालचिनी
- लवंगा - २
- तमालपत्र - १
- धनेपूड - १ चमचा
- गोडा मसाला - २ चमचा
- किसलेलं सुकं खोबरं - २ चमचे
- खसखस - १ चमचा
- चिंच
- तिखट - चवीनुसार (कश्मीरी लाल मिर्च)
- मीठ - चवीनुसार
- कोथिंबीर
- तेल
- मोहरी
- हिंग
- फरसाण
- लिंबू
- पाव किंवा ब्रेड
कृती :
१) मोड आलेली मटकी कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिरच्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, धनेपूड बारीक वाटून घ्या.
३) कढईत जरा तेल गरम करुन त्यात वाटलेला मसाला खमंग परतून घ्या.
४) आता चिरलेला कांदा आणि टॉमेटो आणि नारळ घालून परता.
५) मिश्रणाला तेल सुटले की गॅस बंद करून बाजूला काढून थंड करा.
६) मिश्रण थंड झाल्यावर त्यात 1 ग्लास पाणी मिसळून पातळ पेस्ट तयार करा.
७) आता एका भांड्यात तेल गरम करुन हिंग, हळद,लाल खिट, कटाचा मसाला , चिंचेचा कोळ, मीठ घाला.
८) आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी घ्या.
९) दुसर्या बाजूला 2 चमचे तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हळदाची फोडणी देऊन मटकी घाला.
जरा पाणी घालून त्यात गोडा मसाला घालून उकळून घ्या.
१०) आता उसळ आणि कट तयार आहे.
- सर्व्ह करताना उसळ त्यावर कट आणि त्वावर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू पिळून पाव किंवा ब्रेडसोबत सर्व्ह करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.