चिकन नगेट्स :
साहित्य :
- बोनलेस चिकन - ५०० ग्राम
- ब्रेड
- आलं - लसूण पेस्ट - १ चमचा
- सोया सॉस - १ चमचा
- मिरी पूड - १/२ चमचा
- पेपरीका पावडर - १/२ चमचा.
- मीठ
- तेल
- अंड - १
- दूध - १ चमचा
कृती :
१) ४ ब्रेड घेऊन त्याच्या कडा कापून घ्या. ब्रेड आणि ब्रेडच्या कडा दोन्ही वेग वेगळ्या मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
२) ब्रेड च्या पांढऱ्या चुऱ्या मध्ये चिकन, आलं-लसूण पेस्ट, सोया सॉस, मीरी पूड, पेपरीका पावडर, १/२ चमचा मीठ टाकून ते मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३) वाटलेल्या चिकनला थोडं तेल लावून मळून घ्या. (नरम होई पर्यंत मळावे)
४) एका प्लास्टिक पेपरवर चिकन पसरवून त्याच्या चौकोनी चकत्या कापून घ्या.
५) कापलेल्या चकत्या १ ते २ तास फ्रिजर मध्ये ठेवा.
६) एका भांड्यात अंड फोडून त्यात १ चमचा दूध, चिमूटभर काळी मिरी पुड टाकून ते नीट मिक्स करून घ्या.
७) आता चिकनचे पीस अंड्याच्या मिश्रणात घोळून मग ब्रेडचा उरलेला चुरा लावून ते तेलात तळून घ्या.
टीप :
चिकन नगेट्स फ्रिज मध्ये २-३ महिने राहू शकतात. जेव्हा खायचे असतील तेव्हा अंड्याच मिश्रण तयार करून ते फ्राय करून घाऊ शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.