EGG MAYONNAISE (मेयोनीज )
साहित्य :
१. अंड -१
२. तेल - साधारण ७५ग्राम
३. व्हिनेगर - ३-४ थेंब
४. मीठ - चिमूटभर
कृती :
१) एका BLENDER (ब्लेंडर ) मध्ये एक अंड घेऊन त्यामध्ये तेल, व्हिनेगर, मीठ टाकून ते २-३ मिनिटं ब्लेंडर ने ब्लेंड करून घ्या.
२) ब्लेंड करताना ब्लेंडर एकाच ठिकाणे पकडून ठेवावा. त्या मुळे ते खराब होणार नाही.
अशा प्रकारे EGG MAYONNAISE तयार होईल
अशा प्रकारे EGG MAYONNAISE तयार होईल
MOZZARELLA CHEESE ( (मोझरेला चीज)
साहित्य :
१) दूध -१ लिटर ( निरसे)
२) व्हिनेगर
३) मीठ
४)थंड पाणी
५) गरम पाणी
कृती :
१. एका पतेल्यात दूध घेऊन ते मंद आचेवर १-२ मिनिट गरम करा.
(खूप गरम करू नये अगदी हलकं गरम कराव.)
२. एक वाटीत ४ चमचे व्हिनेगर घेऊन त्यात १ चमचा पाणी घालावे.
३. व्हिनेगरचे हे मिश्रण हळू हळू ओतत राहावे व चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहावे.
४. आता या मिश्रणचा गोळा तयार होऊन पाणी वेगळे होण्यास सुरवात होईल.
५. आता गॅस बंद करून तो दुधाचा बनलेला गोळा बाहेर काढायचा.
त्या गोळ्यात उरलेले पाणी हाताने दाबून काढून टाकावे.
त्या गोळ्यात उरलेले पाणी हाताने दाबून काढून टाकावे.
६. एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात थोडं मीठ टाकावे. त्यात दुधाचा बनलेला गोळा टाकावा. आता त्या गोळ्याला पाण्यातच भिजवून सुट्टा करत राहावं. हि क्रिया ३ ते ४ वेळा करत राहावी. जो पर्यंत गोळा रबरा सारखा होत नाही तो पर्यंत.
७. हीच क्रिया आता थंड पाण्यात सुद्धा करावी.
८. आता बनलेलं चीज एका प्लस्टिक च्या पिशवीत हवा लागणार नाही अशा प्रकारे बंद करून ४ तास फ्रिज मध्ये ठेवावी.
अशा प्रकारे घरच्या घरी चीस तयार होईल. हे चीज जवळ जवळ १ महिना टिकून राहते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.