OREO PUDDING ओरिओ पुडिंग
साहित्य :
- ऑरिओ बिस्कीट - १०
- कॉर्नफ्लोअर - २ चमचे
- पाणी - १/२ वाटी
- व्हाईट चॉकोलेट - १/४ वाटी
- बटर - २ चमचे
- दूध - १ वाटी
- साखर - १ चमचा
- डार्क चॉकलेट - १/२ वाटी
- क्रीम - १/२ वाटी
कृती
१) ओरिओ बिस्किटांना मिक्सर मध्ये बारीक करून घ्या या मध्ये २ चमचे अमूल बटर घालून मिक्स करा .
तयार मिश्रण वाटीत काढून ग्लासच्या साहाय्याने प्रेस करून फ्रिज मध्ये १० मिनिट ठेवा.
२) एका वाटीत कॉर्नफ्लोर मध्ये पाणी मिसळून ठेवा
३) दूध गरम करून त्यामध्ये १ चमचा साखर मिसळून घ्या. आता या मध्ये व्हाईट चॉकलेट बारीक खिसुन टाका व पूर्ण वितळे पर्यंत मंद आचेवर शिजवा.
४) चॉकलेट वितळल्यावर त्यात कॉर्नफ्लोर टाका. कॉनफ्लॉवर घट्ट होई पर्यंत शिजवा.
५ )तयार मिश्रणात ओरिओ बिस्केट चे बारीक काप करून नीट मिक्स करून घ्या.
६) डार्क चॉकोलेट बारीक कापून त्या मध्ये क्रीम टाकून ते वितळून घ्या.
७) आता फ्रिज मधील वाटीत हे मिश्रण घालून त्यात वितळलेले डार्क चॉकलेट घालून वरून १ ओरिओ बिस्कीट ठेऊन १ तास साठी फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा.
आभारी आहे, खूप छान रेसिपी सांगितली
उत्तर द्याहटवा