विविध प्रकारच्या चटण्या

विविध प्रकारच्या चटण्या

Five dry chutney's including an exclusive carrot chutney ...

खोबऱ्याची चटणी 
साहित्य:
  • नारळ - १
  • हिरव्या मिरच्या - ८ ते १०
  • लसूण - ३ ते ४ पाकळ्या
  • कडीपत्ता
  • लिंबू - १
  • मीठ
कृती :
१) नारळ फोडून खोबरे बारीक कापून घ्या.
२) बारीक केलेले खोबरे, कडीपत्त्याची १०-१२ पाने, लसूण व चवीनुसार मीठ टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३) वाटलेले मिश्रण एका वाटीत काढून १ ते २ चमचे लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.
तयार चटणी जेवणा सोबत सर्व्ह करा.


शेंगदाण्याची चटणी
साहित्य :
  • शेंगदाणे - १ मोठी वाटी
  • लसूण - ४ ते ५ पाकळ्या
  • जिरे - १/२ चमचा
  • लाल तिखट - आवडीनुसार
  • मीठ - चवीनुसार
  • तेल - १ चमचा
कृती :
१) कढईत माध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्या.
२)  शेंगदाणे थोडे भाजून झाल्यावर गरम असतानाच त्याची साल काढून घ्या.
३) आता कढईत एक चमचा तेल घालून साल काढलेले शेंगदाणे लाल होई पर्यंत नीट भाजून घ्या.
४) भाजलेले शेंगदाणे थंड करून त्यामध्ये  लाल तिखट, जिरे, मीठ आणि लासून घालून ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.


कारळाची चटणी
साहित्य :
  • कारळे - १ वाटी
  • लाल तिखट / लाल मिरच्या - आवडी नुसार
  • लसूण - १२ ते १५ पाकळ्या
  • मीठ - चवीनुसार
कृती :
१) कारले साफ करून कढईत माध्यम आचेवर खमंग वास येई पर्यंत भाजून घ्या.
२) भाजलेल्या कारळ्यात आवडी नुसार लाल तिखट किव्हा लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

लसणाची चटणी
साहित्य :
  • लसणाचे मोठे कांदे - २  (लसणाची साल काढू नयेत )
  • सुक्या लवंगी/ पंडी मिरच्या - १० ते १२
  • हिंग - चिमूटभर
  • मीठ
कृती :
१) कढईत १/२ ते १ मिनिटं मिरच्या  भाजून घ्या. (मिरच्या जास्त वेळ भाजू नये. )
२) भाजलेल्या मिरच्या मध्ये चावी नुसार मीठ टाकून ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
३) मिरच्या थोड्या वाटून झाल्यावर त्या मध्ये लसूण घालून ते मिश्रण पुन्हा १/२ मिनिटे बारीक करा.
४) वरील मिश्रणात थोडं हिंग घालून परत १/२ मिनिटे वाटून घ्या.

तीळाची चटणी
साहित्य :
  • तीळ -१/२ वाटी
  • लाल तिखट - आवडीनुसार
  • मीठ - चवीनुसार
  • सुखे खोबरे - १/२ वाटी
  • जिरे - १ चमचा
कृती :
१) एका कढईत माध्यम आचेवर तीळ भाजून घ्यावेत.  (२ - ३ मिनिटे )
२) तीळ भाजून झाल्यावर त्या कढईत खोबरे भाजून घ्यावे. ( खोबरे बारीक खिसुन घ्या.)
३) तीळ आणि खोबरे थंड झाल्यावर त्यामध्ये जिरे, आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सर मशे बारीक करून घ्या.

जवसाची चटणी
साहित्य :
  • जवस - १/२ वाटी
  • तीळ - २ चमचे
  • लाल तिखट - १ चमचा
  • मीठ - चवीनुसार
  • जिरे - १/२ चमचा
कृती :
१) जवस माध्यम आचेवर भाजून घ्यावे. ( रंग बदल पर्यंत भाजावे)
२) जवस भाजून झाल्यावर ते थंड करायला ठेऊन त्या कढईत तीळ भाजून घ्यावे.
३) तीळ बाजूला काढून अगदी १ ते २ मिनिटे जिरे भाजून घ्यावं.
४) भाजलेले जवस, तीळ, जिरे एकत्र करून त्या मध्ये मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.

















टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

रेसिपि तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा.